आमच्याविषयी

मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी

संचालक ‘प्रमोद प्रभुलकर’ यांनी २००४ साली ‘गोड गुपित’ (मुख्य भूमिका- दिलीप प्रभावळकर, रिमा लागू आणि ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे ७ बालकलाकार विद्यार्थी), आणि ‘फिनिक्स’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, केनियन विद्यार्थी, ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’ची बालकलाकार), २००६ साली ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ (मुख्य भूमिका - भरत जाधव आणि ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’च्या मुंबई, पुणे, सांगली आणि कोल्हापूर सेन्टर्स मधील ५०० विद्यार्थी ), २००९ साली ‘सुंदर माझं घर’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, सुहास परांजपे, राहुल मेहंदळे, मधुराणी प्रभुलकर, विशाखा सुभेदार), २०१९ साली ‘युथट्यूब’ (मुख्य भूमिका - ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे विद्यार्थी कलाकार शिवानी बावकर, पुर्णिमा डे आणि इतर ३०० विद्यार्थी सहकलावंत) अशा मनोरंजक आणि सामाजिक चित्रपटांचे लेखन - दिग्दर्शन केले.

कोर्सेस

स्पेशल ॲक्टिंग कोर्स

मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या स्पेशल ॲक्टिंग कोर्सचा संपूर्ण अभ्यासक्रम संचालक प्रमोद प्रभुलकर यांनी विचारपूर्वक आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तयार केला आहे.
मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थांच्या मनातून अभिनयाची भीती कमी व्हावी. बिनधास्त प्रेक्षकांसमोर अभिनय सादर करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्हणून संचालक प्रमोद प्रभुलकर यांनी पहिले काही लेक्चर्स विद्यार्थ्यांची bonding वाढेल अशाप्रकारे डिझाईन केले आहेत.

Read More
img



प्रमोद प्रभुलकर (लेखक, दिग्दर्शक)

(व्यवस्थापकीय संचालक)

दहावीला ९०.१४% गुण मिळवून महाराष्ट्रात १७वे आलेले ‘प्रमोद प्रभुलकर’ हे अभ्यासात हुशार असूनही त्यांचा कल चित्रपटसृष्टीकडे होता. त्यांच्या या सिनेसृष्टीच्या ओढीमुळे त्यांनी ‘गोड गुपित’ (मुख्य भूमिका- दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू ), ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ (मुख्य भूमिका - भरत जाधव), ‘सुंदर माझं घर’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, सुहास परांजपे, मधुराणी प्रभुलकर, राहुल मेहेंदळे), ‘फिनिक्स’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, केनियन कलावंत), ‘युथट्यूब’ (मुख्य भूमिका - शिवानी बावकर) अशा मनोरंजक आणि सामाजिक चित्रपटांचे लेखन - दिग्दर्शन केले. मराठी फिल्म इंडस्ट्रीचा ३० वर्षांचा अनुभव असलेल्या ‘प्रमोद प्रभुलकर’ यांनी २००२ साली ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’ची स्थापना केली.


फॅकल्टी


img