दहावीला ९०.१४% गुण मिळवून महाराष्ट्रात १७वे आलेले ‘प्रमोद प्रभुलकर’ हे अभ्यासात हुशार असूनही त्यांचा कल चित्रपटसृष्टीकडे होता. त्यांच्या या सिनेसृष्टीच्या ओढीमुळे त्यांनी ‘गोड गुपित’ (मुख्य भूमिका- दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू ), ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ (मुख्य भूमिका - भरत जाधव), ‘सुंदर माझं घर’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, सुहास परांजपे, मधुराणी प्रभुलकर, राहुल मेहेंदळे), ‘फिनिक्स’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, केनियन कलावंत), ‘युथट्यूब’ (मुख्य भूमिका - शिवानी बावकर) अशा मनोरंजक आणि सामाजिक चित्रपटांचे लेखन - दिग्दर्शन केले. मराठी फिल्म इंडस्ट्रीचा ३० वर्षांचा अनुभव असलेल्या ‘प्रमोद प्रभुलकर’ यांनी २००२ साली ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’ची स्थापना केली.
आपल्या सर्व चित्रपटांमध्ये ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’च्या अनेक विद्यार्थ्यांना प्रमुख आणि सहाय्यक भूमिकांमध्ये रोल्स दिले.
शिवानी बावकर (लागीरं झालं जी), ऋता दुर्गुळे (दुर्वा / फुलपाखरू/ मन उडू उडू झालं ), गिरिजा प्रभू (सुखं म्हणजे नक्की काय असतं...!), किरण गायकवाड (लागीरं झालं जी/ देवमाणूस), निखील चव्हाण (लागीरं झालं जी), स्वरदा ठिगळे (ताराराणी), आकाश शिंदे (सहकुटुंब सहपरिवार) यांच्यासारखे ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे असंख्य विद्यार्थी छोट्या- मोठ्या आणि मुख्य भूमिकांमध्ये आज चित्रपट, टी.व्ही. सिरियल्स, नाटक आणि जाहिरातींमधून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.
‘प्रमोद प्रभुलकर’ हे लहानपणापासूनच जिद्द बाळगणारे व्यक्तिमत्व आहे. शालेय वयापासूनच चित्रपटसृष्टीची आवड असल्यामुळे शाळा/ कॉलेजमध्ये शिकत असताना ते सिनेमाच्या सेटवर शुटींग पाहण्यासाठी जाऊ लागले. चित्रपटाच्या नट-नट्या आणि शुटींगपेक्षा प्रमोद प्रभुलकर यांचे लक्ष दिग्दर्शकाकडे असायचे. दिग्दर्शक कशाप्रकारे आपल्या नजरेतून एखाद्या कथेत रंग भरतो, त्या कथेचा अर्थ त्याच्या नजरेतून मांडतो या सर्व गोष्टींविषयी त्यांना कुतूहल निर्माण झाले. दिग्दर्शक म्हणून ‘प्रमोद प्रभुलकर’ यांच्या करियरची सुरुवात ‘चौकट राजा’ या चित्रपटाचे प्रसिध्द दिग्दर्शक ‘संजय सूरकर’ यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यापासून झाली. प्रमोद प्रभुलकर यांनी १० वर्ष सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपट सृष्टीत काम केले.
प्रमोद प्रभुलकर यांनी सामाजिक आशयाचे, संवेदनशील तरीही मनोरंजक आणि लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणारे चित्रपट लिहून दिग्दर्शित केले.
( लेखक/ दिग्दर्शक : प्रमोद प्रभुलकर )
( प्रमुख भूमिका : - दिलीप प्रभावळकर, रिमा लागू आणि ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे ७ बालकलाकार विद्यार्थी)
( लेखक/ दिग्दर्शक : प्रमोद प्रभुलकर )
( प्रमुख भूमिका : - भरत जाधव आणि ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’च्या मुंबई, पुणे, सांगली आणि कोल्हापूर सेन्टर्स मधील ५०० विद्यार्थी )
( लेखक/ दिग्दर्शक : प्रमोद प्रभुलकर )
( प्रमुख भूमिका : दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, सुहास परांजपे, राहुल मेहंदळे, मधुराणी प्रभुलकर, विशाखा सुभेदार)
( लेखक/ दिग्दर्शक : प्रमोद प्रभुलकर )
( प्रमुख भूमिका : - दिलीप प्रभावळकर, केनियन विद्यार्थी, ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’ची बालकलाकार)
( लेखक/ दिग्दर्शक : प्रमोद प्रभुलकर )
( प्रमुख भूमिका : ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे विद्यार्थी कलाकार शिवानी बावकर, पुर्णिमा डे आणि इतर ३०० विद्यार्थी सहकलावंत )
( लेखक/ दिग्दर्शक : प्रमोद प्रभुलकर )
भविष्यात प्रमोद प्रभुलकर नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे पार्ट- २ ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत. या फिल्ममध्ये भरत जाधव यांच्या बरोबर ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे विद्यार्थी असणार आहेत.
( लेखक/ दिग्दर्शक : प्रमोद प्रभुलकर )
३७० कलम रद्द केल्यावर काश्मीरमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे. त्यानंतर काश्मिरी नागरिक, अतिरेक्यांच्या स्वातंत्र्याचा लढा आणि भारतीय सरकारचा त्यावरचा दृष्टकोन या सर्व विषयांना घेऊन एका मुस्लिम बाप बेट्याच्या संघर्षांची कथा आणि त्यातून स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय...? याचा संदेश जगाला देणारा आणि जगामध्ये अतिरेकी कारवाया कमी व्हाव्यात, अतिरेकी होऊ पाहणाऱ्यांना मानवतेचा संदेश देणारा 'जख्म ए काश्मीर' हा हिंदी चित्रपट हिंदीतील स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, अनुपम खेर, आयुष्यमान खुराणा, शाहिद कपूर आणि ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांना संधी देऊन लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
लहानपणापासूनच स्वतःचा विचार न करता जगाचा विचार करणारे आणि "हे विश्वची माझे घर", “जे का रंजले गांजले.. त्यासी म्हणे जो आपुले.. तोचि साधू ओळखावा.. देव तेथेचि जाणावा.." या उक्तीप्रमाणे आचरण असणारे प्रमोद प्रभुलकर शाळेमध्ये असल्यापासूनच संत साहित्य, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, दासबोध या ग्रंथांच्या वाचनाचा परिणाम प्रमोद प्रभुलकर यांच्या जीवनावर झालेला आहे. ते समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी काम करायला सजग असतात.
देशभरातल्या सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचा शेतमाल आणि त्याचे फूड प्रॉडक्ट्स हे जगभरातल्या ग्राहकांपर्यंत पोहचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवण्यासाठी आणि भारतीय संस्कृती या खाद्यपदार्थांच्या आणि शेतमालाच्याद्वारे जगभरातील प्रत्येक कुटुंबाच्या ताटामध्ये पोहचवावी, भारतीय खाद्य संस्कृती जगामध्ये जोपासली जावी यासाठी प्रमोद प्रभुलकर यांनी ‘वेदव्यास’ या महान ऋषींच्या नावाने ‘वेदव्यास एक्स्पोर्ट अँड इम्पोर्ट प्रा. लि.’ या कंपनीची स्थापना केलेली आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोंकण किनारपट्टीवरील मत्स्य शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. तसेच कोंकणातील ताजे मासे शहरातील ग्राहकांपर्यंत पोहचवावे या हेतूने ‘फिश हाऊस’ ब्रँडची स्थापना प्रमोद प्रभुलकर यांनी केलेली आहे. कंपनीचे नाव ‘मिरॅकल्स सी फूड्स प्रा. लि.’ आहे. या कंपनीमार्फत ताजे कच्चे मासे, शिजवलेले मासे, माशांच्या विविध रेसिपीज् होम डिलिव्हरी करून ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम चालू आहे.
वेद, उपनिषदे, भगवद्गीता यातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनाची मशागत व्हावी, यासाठी प्रमोद प्रभुलकर यांनी फक्त विद्यार्थीच नव्हे तर समाजातील सर्व गटातील स्त्री-पुरुष यांच्यासाठी ‘आर्य चाणक्य वेद विज्ञान मंदिर’ या संस्थेची स्थापना केली आहे. नागरिकांची अध्यात्मिक बैठक पक्की व्हावी, मानसिक आरोग्य सुदृढ करून त्यांना देशसेवेसाठी प्रेरित करावे या उद्देशाने ‘आर्य चाणक्य वेद विज्ञान मंदिर’ या संस्थेची स्थापना केली आहे.
आजचे दूषित झालेले राजकीय वातावरण आणि सामान्य नागरिकांवर होणारा अन्याय यासाठी प्रमोद प्रभुलकर यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र माझा’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली आहे. २०२९ साली इलेक्शन्स लढवून महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा प्रमोद प्रभुलकर यांचा विचार आहे. यासाठी अतिशय सामान्य पण संवेदनशीलपणे काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांना तिकिटे देऊन, आमदार करून महाराष्ट्रात ‘आर्य चाणक्य’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या विचारांचे ‘रामराज्य’ स्थापन करण्यासाठी ‘महाराष्ट्र माझा’ या पक्षाची स्थापना केलेली आहे. पुढची पाच वर्ष महाराष्ट्रातील शेतकरी, त्यांचे कुटुंबीय, महाराष्ट्रातील विद्यार्थी, शहरातील नागरिक यांच्यासाठी काम करून हे नवीन आगळे वेगळे क्रांतिकारी सरकार महाराष्ट्रात आणण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने प्रमोद प्रभुलकर पाऊले टाकत आहेत.
टीव्ही वरून लग्न जुळू शकतात...! अशी अनोखी संकल्पना घेऊन प्रमोद प्रभुलकर यांनी ‘यंदा कर्तव्य आहे’ हा कार्यक्रम २००५ ते २००७ मध्ये E-TV वर प्रदर्शित केला. त्याचे १०० एपिसोड्स प्रदर्शित झाले. त्यात महाराष्ट्रातील लग्नेच्छुक मुले-मुली सहभागी झाले. प्रमोद प्रभुलकर यांनी या कार्यक्रमातून ५२ लग्नं यशस्वीरीत्या लावली.
‘सामना’ वर्तमानपत्राच्या ‘फुलोरा’ या पुरवणीतून मराठीतल्या ५२ प्रतिष्ठित, अतुलनीय आणि विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या यशस्वी लोकांच्या मुलाखती घेऊन एका सजग स्तंभलेखकाची भूमिका प्रमोद प्रभुलकर यांनी बजावली.
‘एक फोन फिरवा आणि घरपोच तिकीट मिळवा..’ ही प्रमोद प्रभुलकर यांची संकल्पना १९९८ साली ‘तू तिथं मी’ या सिनेमावर राबवून तो पिक्चर तेव्हा मुंबईमध्ये हाऊसफुल्ल केला. ही संकल्पना प्रमोद प्रभुलकर यांनी स्वतःच्या चित्रपटांसाठीही राबवली. मराठी प्रेक्षकांना सिनेमागृहात आणण्याचे काम प्रमोद प्रभुलकर यांच्या या संकल्पनेने केले. हीच संकल्पना आता book my show म्हणून प्रसिध्द आहे.
प्रमोद प्रभुलकर हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. दहावीला ९०.१४ % मार्क्स मिळवून बोर्डात येऊनही आपली शिक्षण पद्धती चुकीची आहे आणि ती रोजगार आधारित असली पाहिजे यासाठी विविध उपक्रम राबवणारे आणि सामाजिक बदल होण्यासाठी विविध चित्रपटांचे लेखन / दिग्दर्शन केले.
शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे म्हणून ‘शेतकरी माझा’, कोळी बांधवांचे कल्याण होण्यासाठी ‘फिश हाऊस’, आणि महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे न्याय व हक्काचे सरकार मिळावे म्हणून ‘महाराष्ट्र माझा’ या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची मनीषा बाळगणारे प्रमोद प्रभुलकर हे अत्यंत मनमिळावू, संवेदनशील, उत्साही व्यक्तिमत्व शिवाजी महाराज आणि आर्य चाणक्य यांच्या विचारशैलीच्या प्रभावाखाली असलेले आणि संतांच्या विचारांनी मेणाहूनही मऊ मन असलेले प्रमोद प्रभुलकरांनी कलेच्या क्षेत्रामध्ये ‘मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड मीडिया प्रा. लि.’ या कंपनीची स्थापना केली. Special Acting Course, Film Making Course, Makeup Course, Short Film Direction Course, Script Writing Course असे अनेक कोर्सेस या अकॅडमी तर्फे राबवले जातात.
मुंबईत माहीम येथील लोकमान्य विद्यामंदिर या शाळेत प्रमोद प्रभुलकर यांनी शिक्षण घेतले. चौफेर बुद्धिमत्ता, ज्ञान घेण्याची वृत्ती, कष्ट करण्याची तयारी, ज्ञानपिपासू वृत्ती याच्या जोरावर त्यांनी शाळेमध्ये उत्तम मार्क मिळवून दहावीला ९०.१४ % मार्क्स मिळवले. त्यांनी शाळेमध्ये असताना विविध वक्तृत्व स्पर्धा, विविध नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यस्पर्धांमध्ये अॅक्टर म्हणून काम केल्यामुळे कलेविषयी त्यांना शाळेपासूनच ओढ होती. लहानपणी ते तबला शिकले. दहावीला बोर्डात आलेले प्रमोद प्रभुलकर सहजच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकले असते. पण मोठ्या पगाराच्या नोकरीला नाकारून त्यांनी दिग्दर्शक होणे स्विकारले.
शाळेत असताना सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटाचे शूटिंग पाहून चित्रपट दिग्दर्शक होण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. BSC गणित घेऊन त्यांनी पदवी घेतली. त्यांनतर चौकट राजा या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय सूरकर यांच्याकडे ८ वर्ष पैशाची कुठलीही अपेक्षा न करता चित्रपट सृष्टीचे ज्ञान घेतले.
त्यांनतर डॉ. श्रीराम लागू, मोहन जोशी, सोनाली कुलकर्णी या सर्व जेष्ठ कलाकारांसोबत त्यांनी काम केले. न थकता, खूप कष्ट करून त्यांनी दिग्दर्शनाचे धडे गिरवले. २००४ पासून स्वतंत्र लेखक/ दिग्दर्शक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली.
सचिन पिळगावकर निर्मित ‘आये दिन बहार के’ या झी टी.व्ही. च्या मालिकेसाठी आणि तारा चॅनलवर ‘गुगली’ मराठी सिरीयलचे प्रमोद प्रभुलकर यांनी दिग्दर्शन केले. ‘गुगली’ या मालिकेत भरत जाधव, अंकुश चौधरी, निर्मिती सावंत, लिनय येडेकर , सतीश तारे यांसारख्या जेष्ठ कलाकारांनी काम केले.
प्रमोद प्रभुलकर यांनी २००४ साली ‘गोड गुपित’ (मुख्य भूमिका- दिलीप प्रभावळकर, रिमा लागू आणि ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे ७ बालकलाकार विद्यार्थी), आणि ‘फिनिक्स’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, केनियन विद्यार्थी, ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’ची बालकलाकार), २००६ साली ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’ (मुख्य भूमिका - भरत जाधव आणि ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’च्या मुंबई, पुणे, सांगली आणि कोल्हापूर सेन्टर्स मधील ५०० विद्यार्थी ), २००९ साली ‘सुंदर माझं घर’ (मुख्य भूमिका - दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, सुहास परांजपे, राहुल मेहंदळे, मधुराणी प्रभुलकर, विशाखा सुभेदार), २०१९ साली ‘युथट्यूब’ (मुख्य भूमिका - ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चे विद्यार्थी कलाकार शिवानी बावकर, पुर्णिमा डे आणि इतर ३०० विद्यार्थी सहकलावंत) अशा मनोरंजक आणि सामाजिक चित्रपटांचे लेखन - दिग्दर्शन केले.
प्रमोद प्रभुलकर यांनी २००२ मध्ये दादर येथे 6X6 या छोट्याशा रूममध्ये ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’ची सुरुवात केली. सुरुवातील ५ रविवार, प्रत्येकी ३ तास अशा ५२ कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळेत मार्गदर्शनासाठी दिलीप प्रभावळकर, सचिन खेडेकर, रिमा लागू , सुनील बर्वे, अमृता सुभाष, भरत जाधव, प्रशांत दामले यांसारखे अनेक कलावंत येऊन गेले आहेत.
तिथूनच ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’चा प्रवास सुरु झाला. त्यांनतर गेली २१ वर्ष मिरॅकल्सचा प्रवास अथकपणे चालू आहे. ३००० पेक्षा जास्त विद्यार्थी इथे शिकलेले आहेत. प्रमोद सरांनी दिग्दर्शित केलेल्या पाचही चित्रपटांत ‘मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख आणि सहाय्यक भूमिकांमध्ये काम केले. भारतातल्या ॲक्टिंग क्लासचे हे असे पहिलेच उदाहरण असेल.